Senior and Selection Grade Training 2025-2026
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२५-२६
Important News
वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण साठी नाव नोंदणी 15 एप्रिल 2025 पासून ते 25 एप्रिल 2025 पर्यंत Online Mode ने सुरु होणार आहे.
प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने होईल.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (SCERT) सोपवण्यात आलेली आहे.
यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.
१) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.
२) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
३) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक १८.०४.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २५.०४.२०२५ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
५) सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.
६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत
गट क्र. १- प्राथमिक गट (इ.१ली ते ४ थी, इ.१ली ते ५ वी, इ.१ली ते ७ वी, इ. १ली ते ८ वी, इ.६वी ते ८ वी)
गट क्र. २- माध्यमिक गट (इ.९ वी, १० वी)
गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ.११वी, १२ वी)
गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट
See the official letter-
SCERT Website for Registration-
👇

Important-
Eligibility – Should complete 12 years (for senior grade) or 24 Years (for selection grade) service as a teacher.
Service duration will be calculated on the date – 30 April 2025
Registration Dates- 18 April 2025 to 25 April 2025 (Up to 6 p.m.)
Training will be offiline.
Fees- Rs. 2000
See More-
Workload for Jr. College Teacher
Maharashtra State Board (HSC and SSC) App
See video and know about the training –