HomeExamsMaharashtra Teacher Eligibility Test

Maharashtra Teacher Eligibility Test

-

Maharashtra Teacher Eligibility Test – MAHA TET 2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (Maharashtra State Council of Examination), पुणे 4 या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2024 (MAHA TET 2024) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-10/11/2024 रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.


Important Information

1) इ. पहिली ते पाचवी व इ.सहावी ते इ.आठवी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

2) या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

3) ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी.

4) सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक – 09/09/2024 पासून सुरु होत असुन दिनांक 30/09/2024 अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.


Process of conduction exam- MAHA TET 2024

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
१. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 09/09/2024 ते 30/09/2024
२. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे 28/10/2024 ते 10/11/2024
३. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 – दिनांक व वेळ 10/11/2024 वेळ 10.30 a.m. ते 01.00 p.m.
४. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 – दिनांक व वेळ दि.10/11/2024 वेळ 02.00 p.m. ते 04.30 p.m.

काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारासाठी अद्यायावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.


Maharashtra Teacher Eligibility Test

टिप :

1) परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासननिर्णय परिषदेच्या वेबसाईट https://mahatet.in पर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सुचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा.

2) अर्ज भरताना परीक्षाधींनी इ.दहावी, इ.बारावी शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादि बाबतची माहिती मुळ प्रमाणपत्रावरुनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावेत.

3) सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क Email, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करुन ठेवावा, पेपर। (प्राथमिक स्तर) व पेपर ।। (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिका स्तर) असा विकल्प निवडावा, जेणेकरुन परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल, प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.

4) सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ Online अर्ज करता येईल, ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहो याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन, बैंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही.) परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

5) अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनालाईनरित्या स्वीकारले जाईल, विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

6) ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसेच, आवेदनपत्र/कागदपत्रे (प्रमाणपत्रे) गटशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.

7) मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करु न शकल्यास या परोक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल, ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मुळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

8) एका पेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही.

9) सन 2018 व 2019 च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही? याबाबत खात्री करुन वस्तूनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी. आपण भरलेली माहिती चूकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहिल. तसेच या 2018 व 2019 यादी मध्ये समाविष्ठ असुन सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.

10) सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे.

Login to MAHA TET Exam-

Login Page (Click Here)



Number of Papers and Total Marks     

Sr. Details Marks
1) Paper-1: 150 Marks
2) Paper-2: 150 Marks
3) Exam Duration 150 minutes

 

MAHA TET Notification 2024:

The Maharashtra State Council of Examination releases the MAHA TET Notification 2024. The board is going to conduct the MAHA TET (Maharashtra Teacher Eligibility Test) for the Primary (Class I to V) and Upper Primary Teacher (Class VI to VIII).

The MAHA TET Notification consists of the important dates for the exam-related events.

1) Online form filling – 09/09/2024 to 30/09/2024

2) Exam Date – 10/11/2024 (Two sessions)


See more-

CTET – Teacher Eligibility Test 

WordPress and Blogger – Difference

Grammar- Test on Articles

How to Create Google Form Quiz

Best Educational Websites

NEET Exam


Use English Grammar Activity Workbook for Your Study-

Previous article
Next article
proftushar.chavan
proftushar.chavanhttps://activedigitalteacher.com
I am a techno savvy person working as a Junior College Teacher at Rashtriya Junior College, Chalisgaon Dist, Jalgaon

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LATEST POSTS

Proverbs

Proverbs - A proverb is a folk piece of advice or suggestion expressed through short and brief sentences. Most proverbs are related to local beliefs or traditions...

AAPAR ID

AAPAR ID- Know more about it. AAPAR means - AUTOMATED PERMANENT ACADEMIC ACCOUNT REGISTRY AAPAR is based on the principle- One Nation, One Student ID The National Education Policy...

Vocabulary of Time and Numbers

Vocabulary of Time and Numbers - Know more about it. 7 days 1 week 15 days Fortnight 30/31 days 1 month 365 days 1 year 366 days A Leap year 12 months 1 year 10 years 1 decade 25 years Silver...

Bachelor of Pharmacy

Bachelor of Pharmacy : 2024 - 2025 Admission Process- 2024-2025 Online Registration, Scanning & uploading of documents, Documents E- Verification or Physical Verification and Online Application Form...

Most Popular

You cannot copy content of this page