HomeExamsScholarship Exam

Scholarship Exam

-

Scholarship Exam Maharashtra State –

शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. The Pre-Higher Primary Scholarship Examination (Std. 5th) and Pre-Secondary Scholarship Examination (Std. 8th) will be conducted on 9 February, 2025 on the same day in all the districts of Maharashtra state. The notification of the said examination has been published by the Maharashtra State Examination Council on the Council’s website.


इयत्ता 5 वी

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PRE UPPER PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION)

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा

आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा

विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा

इयत्ता 8 वी

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PRE SECONDARY SCHOLARSHIP EXAMINATION)


अधिसूचना-

शासनमान्य शाळांमधून सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. 17/10/2024 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.


Time Table- ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक :-

तपशील शुल्क प्रकार कालावधी
शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे. नियमित शुल्कासह (With Regular Fee) 17 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024
शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे. विलंब शुल्कासह (With Late Fee) 1 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024
शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे. अतिविलंब शुल्कासह (With Super Late Fee) 16 डिसेंबर 2024 ते 23 डिसेंबर 2024
शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे. अति विशेष विलंब शुल्कासह (With Special Super Late Fee) 24 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024

 


Important-

दि. 31/12/2024 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.


शाळा नोंदणी कशी करावी ते पहा. लिंक वर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे स्क्रीन येईल- SCHOOL UDISE CODE 

या मुद्दयापुढील चौकटीत आपल्या शाळेचा 11 अंकी U-DISE सांकेतांक टाईप करून Enter बटन प्रेस करावे.

SCHOOL NAME –

या रकान्यात आपल्या शाळेचे नाव दिसेल.

Is this your school name?

सदर नाव आपल्या शाळेचे असल्यास या रकान्यातील Yes बटनावर क्लिक करावे अन्यथा No बटनावर क्लिक करावे. यानंतर शाळेची माहिती, शाळेचा पत्ता व मुख्याध्यापक यांची माहिती भरावी.


शाळा नोंदणी लिंक:

School Registration Link (Click Here)


See More Exams-

Marashtra CET

CTET – Teacher Eligibility Test

WordPress and Blogger – Difference

Grammar- Test on Articles

How to Create Google Form Quiz

Best Educational Websites

NEET Exam


अभ्यासक्रम: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता  वी)

१) मराठी (प्रथम भाषा)

२) गणित

३) इंग्रजी (तृतीय भाषा)

४) बुद्धिमत्ता चाचणी


विद्यार्थी आवेदन पत्र– Student Application Form शाळा नोंदणी प्रपत्र भरल्यानंतर आपणास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र login करून उपलब्ध होतील.

School Login (Click Here)

लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवरील डाव्या बाजूस असलेल्या Std. 5th (PUP)  किंवा Std. 8th (PUP) या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर आपणास Registration व Fee Payment हे दोन पर्याय दिसतील. Registration या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध होईल.


शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप :

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील. प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी ) साठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) ठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नाच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :

  1. विद्यार्थीहा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे.
  2. विद्यार्थीशासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. 5 वी किंवा इ. 8 वी मध्ये शिकत असावा.

परीक्षेचे माध्यम :

परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल.

१) मराठी  

२) इंग्रजी  

३) हिंदी  

४) उर्दू  

५) गुजराती 

६) कन्नड  

७) तेलुगू

८) सिंधी

महत्वाचे

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर 1 मधील गणित या विषयाची व पेपर 2 मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता  वी)

१) मराठी (प्रथम भाषा)

२) गणित

३) इंग्रजी (तृतीय भाषा)

४) बुद्धिमत्ता चाचणी


शाळा संलग्नता शुल्क 

हे शुल्क दरवर्षी शाळेने भरणे आवश्यक आहे. NTS किंवा NMMS परीक्षेसाठी शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरीही शिष्यवृत्ती परीक्षेकरीता शाळा संलग्नता शुल्क रु.200/- भरणे अनिवार्य राहील.


क्षेत्र

राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखालील सर्व गावे / वस्तीमधील (लोकसंख्या विचारात न घेता) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना “ग्रामीण” (RURAL) भागात करण्यात यावी.

तसेच नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका परिक्षेत्रातील (ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात नसल्यास) शाळांची गणना “शहरी” (URBAN) भागात करण्यात यावी. शाळा ज्या क्षेत्रात आहे तेच क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल.

(संदर्भ – शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६)

लक्षात ठेवा – ग्रामीण व शहरी क्षेत्रासाठी वेगवेगळे शासनमान्य शिष्यवृत्ती संच आहेत. 


 

महत्वाचे

केवळ महाराष्ट्र शासनाचा (एमएससीईआरटी) अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.

CBSE / ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही.

(संदर्भ : शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६)


 

Get more information from the following authorized websites-

www.mscepune.in

 and

https://www.mscepuppss.in


 

 

Previous article
proftushar.chavan
proftushar.chavanhttps://activedigitalteacher.com
I am a techno savvy person working as a Junior College Teacher at Rashtriya Junior College, Chalisgaon Dist, Jalgaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LATEST POSTS

Proverbs

Proverbs - A proverb is a folk piece of advice or suggestion expressed through short and brief sentences. Most proverbs are related to local beliefs or traditions...

AAPAR ID

AAPAR ID- Know more about it. AAPAR means - AUTOMATED PERMANENT ACADEMIC ACCOUNT REGISTRY AAPAR is based on the principle- One Nation, One Student ID The National Education Policy...

Maharashtra Teacher Eligibility Test

Maharashtra Teacher Eligibility Test - MAHA TET 2024 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (Maharashtra State Council of Examination), पुणे 4 या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा...

Vocabulary of Time and Numbers

Vocabulary of Time and Numbers - Know more about it. 7 days 1 week 15 days Fortnight 30/31 days 1 month 365 days 1 year 366 days A Leap year 12 months 1 year 10 years 1 decade 25 years Silver...

Most Popular

You cannot copy content of this page